Home राजकीय खडसे आपल्या संपर्कात; गुलाबराव पाटलांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

खडसे आपल्या संपर्कात; गुलाबराव पाटलांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

0
143


 

gulbrao khadse

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसे आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. एवढेच नव्हे तर, खडसेंच्या सहकार्याने जळगाव जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येईल, असेही ना.पाटील यांनी म्हटले आहे.

 

एका वृत्तवाहिनेने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. त्यात खडसे आपल्या संपर्कात असल्याचा दावा ना.गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तसेच जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत एकनाथ खडसेंची साथ शिवसेनेला मिळणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यातून शिवसेनेकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ना.पाटील यांनी अनेक जण शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावाही केला आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीसाठी घडामोडी सुरू आहेत. शनिवारी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व सदस्यांची एकत्रित बंददाराआड बैठक घेतली, असल्याचेही वृत्त आहे.


Protected Content

Play sound