जळगाव प्रतिनिधी । कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने जबाबदारी वाढली असून जनसेवेच्या व्रतावर भर राहील. जनतेची कामे करण्यासाठी रस्त्यावर उतरुन ‘रस्त्यावरचा मंत्री’ होऊन काम करण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरण्याला प्राधान्य राहील, अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यानंतर ते जळगावात १ जानेवारी रोजी प्रथमच आले. जळगावात ते दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गितांजली एक्सप्रेसने आल्यानंतर रेल्वे स्थानकावर त्यांचे ढोल, ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत झाले. स्वागत मिरवणुकीनंतर त्यांनी पद्मालय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/982151672185648/