जिल्हा परिषदेत भाजपमध्ये फुट ?; चार सदस्यांची बैठकीला दांडी

bjp

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतांना भाजपच्या बैठकीत चार सदस्यांनी दांडी मारल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे भाजपमध्ये फुट पडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत वृत्त असे की, आगामी जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, स्मिता वाघ, मंगेश चव्हाण, डॉ. राजेंद्र फडके, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर आदींची उपस्थिती होती. यात अध्यक्षपद रावेरकडे तर उपाध्यक्षपद जळगाव लोकसभेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मात्र, भाजपचे चार सदस्य अनुपस्थित होते. उपस्थितांनी आजच्या बैठकीला गैरहजर असणारे सदस्यदेखील आपल्यासोबत असल्याचा दावा केला. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार आगामी निवडणुकीत महाआघाडी पूर्ण शक्तीनिशी उतरणार असून हे सदस्य त्यांच्या सोबत गेल्यास जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप होऊ शकतो.

Protected Content