Home क्राईम एकतर्फी प्रेमातून धमकावणार्‍याला अटक

एकतर्फी प्रेमातून धमकावणार्‍याला अटक

0
39


जळगाव प्रतिनिधी । एकतर्फी प्रेमातून स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून तरूणीला धमकावणार्‍या युवकाला पोलिसांनी गजाआड केले आहे.

याबाबत वृत्त असे की, सन २०१६मध्ये त्या विद्यार्थिनीने शहरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दुचाकीवर ती महाविद्यालयात जात होती. या महाविद्यालयात इतर मुलांसोबत धीरज दिलीप चिरमाडे (रा. जुने जळगाव) हा युवक येत होता. धीरजशी तिची ओळख झाली. या वेळी त्याने प्रेम व्यक्त केले तरी त्या विद्यार्थिनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी त्याने विद्यार्थिनीच्या मोठ्या भावाला मेसेज केला. विद्यार्थिनी न बोलल्यास बघून घेण्याची धमकी दिली. तसेच त्याने प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी युवतीसमोरच स्वत:च्या डाव्या हातावर ब्लेडने वार केले होते. १९ डिसेंबर रोजी धीरज याने विद्यार्थिनीसोबत झालेले संभाषण, काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. तर २६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता तिच्या घराजवळ जाऊन अश्‍लील हातवारे केले. यामुळे त्या विद्यार्थिनीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन धीरज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व गोविंदा पाटील हे करत आहेत.


Protected Content

Play sound