पालमध्ये परम पूज्य लक्ष्मण बापू समाधीस्थळ; हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक

pal

यावल प्रतिनिधी । येथुन जवळ असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बसलेले रावेर तालुक्यातील पाल येथील परमपुज्य लक्ष्मण चैतन्य बापुजी यांची जन्मभुमी, कर्मभुमी व तपोवनभुमी आणि समाधीस्थळ आहे. तसेच या आदीवासी क्षेत्रातील दुर्गम क्षेत्रात असलेल्या गावात गेल्या अनेक वर्षापासून हिंदू-मुस्लीम बांधव अतिशय गुण्यागोविंदा राहात असल्याचे दृश्य आहे.

बापुजींनी चैतन्य साधक परिवाराची स्थापना केलेली आहे. बापुजींचे शिष्यगण म्हणुन सर्व जाती धर्माचे नागरिकांचा समावेश असुन त्यांना साधक म्हटले जाते. बापुजी हे जातीभेद विरोधी होते ते सर्वांना प्रेम करत त्यांचा कलयुग मध्ये जातीय भेदभाव मिटाविणे करिताच अवतार झालेला होता. पाल या आदीवासी क्षेत्रातील दुर्गम क्षेत्रात असलेल्या गावात गेल्या अनेक वर्षापासून हिंदू-मुस्लीम बांधव अतिशय गुण्यागोविंदा राहात असतात.

त्या मुळेच बापुजींवर प्रेम करणाऱ्या मध्ये जातीय भेद कधीही दिसुन आला नाही. या ठिकाणी बापुजींवर आदराने श्रध्देने प्रेम करणाऱ्या मध्ये त्यांचे अनुयायी म्हणुन मोठया संख्येने मुस्लीम बांधव देखील आहेत. वर्ष २००९या वर्षात ज्यावेळी बापुजी आजारी झाले ते ब्रहमलिन होण्यापुर्वी त्यावेळीच त्यांचे अनुयायी मुस्लीम बांधव हे बापुजींच्या भेटीला जात असतांना त्यांना म्हणायचे बापुजी कदापी आपण या जगात न राहिल्यास आपल्या या पवित्र मंदिरात येता येणार नाही. त्यावेळीस बापुजींनी आपल्या मुस्लीम अनुयायींना शब्द दिला होता की, ज्यावेळीच ब्रहमलीन होईल त्यावेळी माझ्या समाधी स्थळावर सकाळी हिन्दु बांधव ध्वजपताका लावुन कार्यक्रम करतील तर सांयकाळी ४ वाजता माझे मुस्लीम बांधव यांना समाधीस्थळावर पवित्र हिरवी चादर अर्पण करून दुवा (प्रार्थना) करतील असा आधिकार त्यांना राहील असे, बापुजींनी म्हटल्याप्रमाणे सालाबादप्रमाणे (दि.२५ डिसेंबर २००९) हा बापुजींचा ब्रहमलिन दिवस मागील दहा वर्षापासुन हिंदू मुस्लीम बांधव हे एकत्र येवुन हा दिवस साजरा करतात.

अशा या पाल येथील पवित्र वृंदावन धाममध्ये बापुजींचे समाधीस्थळ असुन व्दाराकाधीशांचे राधाकृष्ण मंदीर आहे. या मंदीराला महाराष्ट्र राज्य शासनाने तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून दिला असुन, या मंदीराचे विदमान अध्यक्ष म्हणुन परमपुज्य संत गोपाल चैतन्य बाबाजी आहेत. असे या संत श्री. लक्ष्मण चैतन्य बापुजीचे समाधीस्थळ हे या खान्देशवासी समस्त हिन्दु मुस्लीम बांधवांसाठी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणुन ओळखले जाते. या गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात हिच बापुजींना खऱ्या अर्थाने सर्वधर्मीय श्रद्धांजली आहे.

Protected Content