Home Cities धरणगाव नगराध्यक्षपद माझ्यासाठी उत्पन्नाचे साधन नव्हे तर सेवेचे माध्यम – निलेश चौधरी

नगराध्यक्षपद माझ्यासाठी उत्पन्नाचे साधन नव्हे तर सेवेचे माध्यम – निलेश चौधरी

0
108

nilesh chaudhari1

धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता रंगतदार टप्प्यात पोहोचली असून सर्व प्रमुख उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. शिवसेनेचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांनीही आज (दि.२६) शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढून नागरिकांच्या भेटी-गाठी घेतल्या. “नगरपालिका हे माझ्यासाठी उत्पन्नाचे साधन नसून समाज सेवेचे माध्यम राहणार आहे.” असा विश्वास त्यांनी नागरिकांना यावेळी दिला.

 

नागरिकांशी बोलताना निलेश चौधरी म्हणाले की, “माझ्या चरितार्थासाठी माझ्याकडे चांगली व्यवस्था आहे. मी अनेकांना रोजगार देवू शकतो, त्यामुळे उत्पन्न मिळविण्यासाठी मी या पदाकडे बघत नाही. तर उलट आपण जनतेचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून मी या पदाकडे बघतो.” त्यांच्या आजच्या प्रचार रॅलीला शहराच्या विविध भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी लोकांनी त्यांचे स्वागत केले.


Protected Content

Play sound