Home Cities जळगाव आंबे वडगाव येथे घरफोडी; 30 हजारांचा ऐवज लंपास

आंबे वडगाव येथे घरफोडी; 30 हजारांचा ऐवज लंपास


robbary clipart

पाचोरा प्रतिनिधी । घरात नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांने घराचा मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरत ठेवलेली रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रमजाक रज्जाक तडवी (वय-21) रा. आंबे वडगाव ता.पाचोरा यांच्या घरात 24 ते 25 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत 20 हजार रूपयांची रोकडे, 10 हजार रूपयांचा मोबाईल असे एकुण 30 रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रमजाक तडवी यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात भाग 5 गुरनं 99/2019 भादवी कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निवृत्ती मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound