राज्य सरकारच्या मदतीने धरणगावला ‘मॉडेल शहर’ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार : निलेश चौधरी

nilesh chaudhary

 

धरणगाव (प्रतिनिधी) पार्किंग व्यवस्था, पाणी पुरवठा, आठवडा बाजार व्यवस्थापन, विकास कामांचा दर्जा सुधारणे, अशी अनेक कामे करून धरणगावला ‘मॉडेल शहर’ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांनी केले आहे.

 

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना निलेश चौधरी पुढे म्हणाले की, राज्य सरकार आणि आमदार गुलाबराव पाटील यांच्या मदतीने शहराच्या विकासासाठी नवनवीन योजना आणण्याचा प्रयत्न करून धरणगाव शहराला एक रोल मॉडेल करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच कचरा, रहदारी, वाहतुकीची कोंडी या समस्यांवर लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करू. पालिकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मदतीने कचरामुक्त शहराचे एक मॉडेल बनवण्याचा मानसही निलेश चौधरी यांनी व्यक्त केला. शहराचा सर्वागीण विकास करण्यासाठी पुढील ५० वर्षांची वाटचाल लक्षात घेऊन आराखडा बनविण्याचा प्रयत्न करू. शहरात बालोद्यान उभारण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल,असाही मनोदय श्री.चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content