Home Cities जामनेर साखर पुड्यातच लग्न : पहुरचे लोढा आणि शिर्डीचा दोशी परिवाराचा आदर्श

साखर पुड्यातच लग्न : पहुरचे लोढा आणि शिर्डीचा दोशी परिवाराचा आदर्श


पहूर त.जामनेर (वार्ताहर) लग्न म्हटले की, अनेक विधी, परंपरा, खानपान, मानपान अशा अनेक विधी पार पाडत असतांना वधू पित्याला आणि वर पित्याला फार मोठी कसरत करावी लागते. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत साखर पुड्यातच लग्न आपटून पहुरचा लोढा परिवार, आणि शिर्डीच्या दोशी परिवाराने एक नवीन आदर्श घालून दिलाय.

सविस्तर असे की, पहुर येथील रिखबचंद रायचंद लोढा यांच्या लहान मुलगा महेंद्रकुमार लोढा यांची कन्या दिशा हिचे शिर्डी येथील प्रकाशचंद उत्तमचंद दोशी यांचा मुलगा कमलेश यांच्याशी विवाह ठरला. दि २५ जानेवारी रोजी पहुर येथील राजेंद्र लोढा यांच्या मुलीचे लग्न शिर्डी येथे होते. त्या ठिकाणी कु. दिशा आणि तिचे आजोबा रिखबचंद लोढा हे दोघ जण शिर्डी येथे लग्नाला गेले होते. त्या ठिकाणी शिर्डी निवासी मदनलाल रूणवाल, रेखा रुणवाल यांचे लोढा परिवारशी संबंध असल्याने यांनी पुढाकार घेत कमलेश दोशी हा मुलगा सुंदर आहे. तो पाहून घ्या, या विनंतीला मान देऊन रिखबचंद लोढा यांनी मुलगा बघितला आणि पसंतीचा होकार दिला. त्याचवेळी दिशा हिनेही मुलला पाहून घेतले आणि दोशी परिवाराने सुद्धा दिशाला सर्व लोकांनी पाहून पसंतीचे होकार दिला. फक्त दोन दिवसातच त्यांनी होकार देऊन साखरपुड्याची तारीख काढून घ्या, असे सांगितले. यानुसार ८ तारखेला नियोजित साखरपुडा ठरले होते. यासाठी मुलीचे आजोबा स्वरूप लोढा, मोठे वडील सतीश लोढा, प्रफुल्ल लोढा संजय लोढा, जीतेंद्र लोढा हे तयारी करत होते. मात्र, खुद्द वर कमलेश दोशी यांनी लोढा परिवारा जवळ प्रस्ताव ठेवला की, आपली तयारी असेल तर साखरपुड्यातच लग्न करायचे आहे. यावर लोढा परिवार चिंतेत झाले होते. मात्र, काही वेळा नंतर लोढा परिवाराने ही होकार दिला. त्यानंतर एका रात्रीतून सर्व नातेवाईक,मित्र परिवाराला दुरध्वनीवरून जितक्या लोकांशी संपर्क होईल, तितक्या लोकांना निमंत्रण देण्यात आले. अवघ्या २५० तो ३०० लोकांच्या उपस्थितीत साखरपुड्यातच दुपारी लग्न लावण्यात आले. या लग्नात जलसंपदामंत्री गिरीश महाजन ,जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी वधू – वरांना शुभआशीर्वाद देत म्हणाले की, आदर्श लग्न , सामूहिक लग्न ही काळाची गरज आहे. आम्ही आमच्या मतदार संघात फिरत असताना अत्यंत छोट्या छोट्या गावात दहा-दहा वेळा फक्त लग्नाच्या हजेरी लावत फिरावे लागते. या पेक्षा अशा लोढा-दोषी परिवाराचा आदर्श सर्वानीच घ्यायला हवा,असे मनोगत व्यक्त केले. लग्नाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश लोढा, प्रवीण लोढा, दिलीप बेदमुथा किशोर लोढा, विजय डोशी , रमनलाल रूणवाल,नंदलाल रुणवाल, श्रेणीक रुणवाल आदींनी मेहनत घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound