रावेर (प्रतिनिधी) ऐनपूर येथील १४ वर्षीय मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत रावेर पोलिसात शून्य क्रमांक गुन्हा दाखल करून निंभोरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
या बाबत वृत्त असे की, ऐनपूर येथील एका १४ वर्षीय राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना ७ वाजेच्या सुमारास घडली.रावेरातील श्रीपाद हॉस्पिटलमध्ये आणल्यावर डॉ.योगेश पाटील यांनी तिला मृत घोषित केले.यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असता पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे,पोलीस उपनिरीक्षक अमृत पाटील, चंद्रकांत शिंदे,मनोज भास्के यांनी रावेर ग्रामीण रुग्णालय गाठन पंचनामा करून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची शून्य क्रमांकाने नोंद करण्यात आली आहे.