रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील चोरवड येथे आरटीओ चेक पोष्टवर दारू पिऊन धिंगाना घालणाऱ्या व मोटार वाहन निरीक्षक आणि कनिष्ठ लिपिकास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तिघांना रावेर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण पाटील (वय-27), योगेश रजाने (वय-34) आणि मनिष गोसावी (वय माहित नाही) असे आरोपींचे नाव असून हे (दि.19) रोजी चोरवड येथील आरटीओ चेक पोष्टवर येऊन येथील ड्युटीवर असलेले मोटार वाहन निरीक्षक नितिन अहिरे आणि कनिष्ठ लिपिक बापूराव कापले यांना संबधित आरोपींनी शिवीगाळ करत तुम्ही येथे कशी ड्युटी करता पाहूनच घेतो, असे म्हणून अहिरे यांना धक्काबुक्की केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करून शांतता भंग करून गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना तात्काळ अटक करून आरोपींची वैदयकीय तपासणी केली असता दारू पिल्याबाबत सर्टिफिकेट हस्तगत केले आहे. घटनास्थळी पो.नि रामदास वाकोडे तपास अधिकारी पो.नि.शितलकुमार नाईक यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.