Home Cities अमळनेर राज्य अधिवेशनात क्रीडा शिक्षकांचा ज्वालामुखी पेटला

राज्य अधिवेशनात क्रीडा शिक्षकांचा ज्वालामुखी पेटला


अमळनेर (प्रतिनिधी) शारिरिक शिक्षणाच्या बाबतीत राज्यशासनाने प्रचंड अन्याय केला असून, याबाबतची धग साई दरबारी शिर्डी येथे पहिल्या अधिवेशनात ज्वालामुखीरूपी अग्निचा उद्रेक झाला.राज्यस्तरीय अधिवेशनाचे शिर्डी येथे आज उदघाटन पदवीधर आमदार सुधीर तांबे, शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते करण्यात आले .प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ऑलंपिक संघटेनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, भारतीय तलवारबाजी असोशीएसन चे खजिनदार अशोक दुधारे , उप शिक्षण अधिकारी प्रकाश जराड, राज्य वॉलीबॉल असोशीएसन चे अध्यक्ष पार्थ जोशी व बालभारतीच्या सेवानिवृत्त विशेष अधिकारी डॉक्टर संध्या जिंतूरकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याध्याक्ष विश्वनाथ पाटोळे यांनी केली. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष्य राजेंद्र कोतकर आपल्या भाषणात म्हटले आहे की, शारिरिक शिक्षणाच्या बाबतीत राज्य शासन क्रीडा शिक्षकास व्यवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.शासनाने संच मान्यतेतून क्रीडा शिकक्षकास हद्द पार करण्याचा मार्ग अवलंबत आहे. मात्र सुदृढ भारत क्रीडा शिक्षकच बनवू शकतो. तसेच शिंदे यांनी मी क्रीडा शिक्षक असल्याचा मला अभिमान आहे. मुख्याध्यापका नंतरचे काम शाळेत क्रीडा शिक्षक करत आसतो.शासनाणे क्रीडा शिक्ष्याकांना शाळा बाह्य काम देता कामा नये . आजकाल लहान मुल आईला म्हणत “आई मला खेळायला जाऊ दे न वा ” ,आई म्हणते जा खेळायला मात्र शासन क्रीडा शिक्षकाला खेळू द्यायला तयार नाही.क्रीडा शिक्षक जर टिकला नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन शेतकऱ्यां सारखे आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.

आमदार सुधीर तांबे म्हणाले की, आजकाल समाजामध्ये विद्वेष्याचे वातावरण होत आहे.केवळ खेळामुळेच विद्वेष्य नाहीसा होऊ शकतो.एका विक्षिप्त सचिवाने क्रीडा शिक्षकाला संच मान्यतेतून वगळले .क्रीडा शिक्षक हा शाळेचा आत्मा असतो. क्रीडा शिक्षक हा पूर्ण वेळ असलाच पाहिजे एकीकडे खेलो इंडिया आणि सि एम चषक भरवायचे आणि दुसरीकडे राज्य शासन शारिरिक शिक्षणाच्या बाबतीत नकारात्मक भूमिका घेत आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे म्हणाले की, शिक्षकाना अनेक समस्या भेडसावत आहे. या समस्या सोडवायच्या असतील तर त्यांनी संघटीत होण गरजेच आहे. आपण कोणत्या पक्ष्याचे आहोत हे न बघता आपण शिक्षक आमदार आहोत आणि शिक्षकांचे प्रश्न आपण मार्गी लावले पाहिजे. याची मला जाणीव आहे शाळेत क्रीडा शिक्षकच नसेल तर विध्यार्थ्यांचे भवितव्य घडणार नाही .शारिरिक शिक्षकांच्या या समस्यांसाठी शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्री याच्या सोबत बैठक घडवून आणू असे त्यांनी आश्वासन दिले. तर भारतीय ओलिंपिक असोशीएशनचे सहसचिव नामदेव शिरसगावकर म्हणाले की, क्रीडा शिक्षक हा प्रॅकटीकल असतो. सध्याच्या युगात त्याने स्वतःला अपडेट केले पाहिजे. मुलांचे उज्वल भविष्यासाठी पाया मजबूत केला पाहिजे. आणि असे जर झाले नाही तर येत्या दहा वर्षात खेळाडू शोधणे मुश्कील होऊन जाईल देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर हा अग्नी गाव,जिल्हा ,राज्य व महाराष्ट्रभर पसरू या व सुदृढ भारत करूया.या नंतर शिवदत्त ढवळे व अशोक दुधारे यांनी मनोगत व्यक्त केले.

यांचा झाला सत्कार

या वेळी महाराष्ट्र वोलीबाल असोशीएसनचे अध्यक्ष पार्थ जोशी व छत्रपती पुरस्कार प्राप्त श्वेता गवळी,संजय पाटील ,राजेंद्र पवार ,डा नितीन चवहाळे व इतरांचा सत्कार करण्यात आला.मंत्री महोदयांची अनुपस्थिती- सदर अधिवेशनासाठी राज्याचे मंत्री अनुपस्थित होते.या अधिवेशनाच्या उदघाटनासाठी क्रीडा व शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच पालक मंत्री रामजी शिंदे व राज्याचे इतर लोकप्रतिनिधी आले नाहीत या बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. सूत्र संचलन राजेंद्र कोहोकडे व अमृत बिऱ्हाडे यांनी केले व आभार ज्ञानेश काळे यांनी व्यक्त केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound