Home Cities जळगाव दोनगावच्या विद्यार्थ्यांचा बस स्थानकात ठिय्या

दोनगावच्या विद्यार्थ्यांचा बस स्थानकात ठिय्या

0
24

जळगाव प्रतिनिधी । बसच्या मार्गात केलेला बदल आणि वेळेवर बसेस धावत नसल्याने दोनगावच्या विद्यार्थांनी बसस्थानकात ठिय्या मांडला. अधिकारी व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

याबाबत वृत्त असे की, दुपारी दोन वाजेची बस दुपारी चारपर्यत न आल्याने शिक्षणासाठी शहरात येवून नियमित अपडाऊन करणारे विद्यार्थी संतप्त झाले. आगाराच्या अधिकार्‍यांकडे व्यथा मांडूनही ती सोडवली जात नसल्याने या विद्यार्थ्यांनी थेट बसरोकोचा पवित्रा घेतला. आगाराच्या प्रवेशद्वाराजवळच बसेस अडवल्याने येणार्‍या बसेस रस्त्यावर उभा राहिल्या. आगाराच्या अधिकार्‍यांनी बसेस सोडण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, लेखी आश्‍वासन द्यावे या मुद्यावर ते अडून राहिले. अखेर पोलिस अधिकारी व आगारप्रमुख यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.


Protected Content

Play sound