यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अट्रावल येथील अल्पवयीन मुलीस त्याच गावातील एका तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पिडीत कुटंबिय 14 डिसेंबर रोजी आपल्या घरी झोपले असता रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पिडीत मुलीच्या वडीलांना जाग आली त्यावेळी मुलगी दिसून आली नाही. त्यांनी इतरत्र शोध घेतल्यानंतर मिळून आली नाही. यावेळी गावातील अजय विलास कोळी हा तरूण देखील 14 डिसेंबर पासुन गावात नाही. दरम्यान याप्रकरणी मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून फूस लावून घरातून पळून नेल्याप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिता कोळपकर करीत आहे.