मुंबई प्रतिनिधी । पेट्रोलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात ६ पैशांनी कपात झाली आहे. या कपातीमुळे पेट्रोलचा दर ८०.२९ रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोलच्या दरात कपात झाली असताना डिझेलचे दर मात्र, स्थिर आहेत.
तेल वितरक कंपन्यांनी घेतलेल्या आढाव्यानंतर पेट्रोल दरात सहा पैशांची कपात झाली आहे. इंडियन ऑईलच्या दर पत्रकानुसार दिल्लीत पेट्रोल दर ७४.६३ रुपये असून डिझेलसाठी ६६.०४ रुपये मोजावे लागत आहे. दिल्लीत स्थानिक कर कमी असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर ८०.२९ रूपये असून डिझेल ६९.२७ रुपये प्रति लिटरआहे. कोलकात्यात पेट्रोल प्रति लिटर ७७.२९ असून डिझेल ६८.४५ रुपयांवर स्थिर आहे. नोएडात पेट्रोलचा दर ७६.०० रूपये असून डिझेल ६६.३५ रुपये प्रति लिटरआहे. रविवारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात १० ते ११ पैशांची कपात केली. सोमवारी त्यात आणखी ५ पैशांची कपात केली. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग वाढ होत होती मात्र, आता पेट्रोल स्वस्त होत असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.