नवी दिल्ली वृत्तसंस्था । बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अनेक नव्या प्रयोगांना सुरुवात केली असून भारतीय क्रिकेटमधील सुधारणा करण्याच्या दृष्टीने गांगुलीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यात स्पर्धेतील संघ परदेशात देखील जाऊन क्रिकेट खेळतील, अशी चर्चा असताना आता बीसीसीआय मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहे.
टी-२० लीग स्पर्धेतील आयपीएलची लोकप्रियता प्रचंड आहे. या स्पर्धेतील संघ परदेशात देखील जाऊन क्रिकेट खेळतील अशी चर्चा असताना आता बीसीसीआय मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पाच नोव्हेंबर रोजी झालेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली होती. चॅम्पियन्स लीग स्पर्धा बंद झाल्यानंतर जो वेळ शिल्लक आहे, त्या वेळेत कोणती स्पर्धा घ्यावी, यावर मिनी आयपीएल हा पर्याय समोर आल्याचे समजते.
आयपीएलच्या गर्व्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आता बीसीसीआयच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. चॅम्पियन लीग स्पर्धा ५ वर्षांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. या स्पर्धेत जगभरातील सर्वोत्तम टी-२० संघ खेळत असत. ही स्पर्धा २०१४नंतर बंद करण्यात आली होती.