Home Cities धरणगाव जैन स्पोर्ट्सच्या सोनल हटकरची अश्वमेघ साठी निवड

जैन स्पोर्ट्सच्या सोनल हटकरची अश्वमेघ साठी निवड


जळगाव (प्रतिनिधी) जैन स्पोर्ट्स अकॅडमी ची खेळाडू व मु जे महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मीक हटकर हिची महाराष्ट्र राज्याच्या आंतरविद्यापीठ अश्वमेघ स्पर्धेसाठी बास्केटबॉलच्या संघात निवड झाली असून दिनांक १३ ते १८ फेब्रुवारी पासून मुंबई येथे सुरू होणाऱ्या स्पर्धे साठी ति बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा चे प्रतिनिधित्व करणार आहे.

९ फेब्रुवारी पासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडांगणावर प्रशिक्षण शिबिरासाठी तिला आज जैन स्पोर्टस ॲकॅडमीतर्फे निरोप देण्यात आला.जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे समनव्यक फारूक शेख यांनी तिचा क्रीडा साहित्य व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन,जैन स्पोर्ट अकॅडेमीचे अध्यक्ष अतुल जैन,क्रिडा समन्वयक फारुक शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे, बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक वाल्मीक पाटील, सहाय्यक रवींद्र धर्माधिकारी, मनपा क्रीडा अधिकारी विवेक आळवणी, प्रवीण ठाकरे, नरेंद्र चव्हाण, आदींनी तिचे अभिनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound