आजपासून महागले “दूध”

milk

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राज्यातील दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. शनिवारी दूध उत्पादक संघाची एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादक संघाने गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही दरवाढ रविवारपासून लागू करण्यात आली आहे.

अमूलने अमूल गोल्ड आणि अमूल ताजा या दुधाच्या दरांमध्ये दोन रुपये वाढ केली आहे. मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगलामध्ये रविवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. तर मदर डेअरीनेही दिल्ली-एनसीआरमध्ये प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ लागू केली आहे. आतापर्यंत ४० रुपये लिटर दराने मिळणारे मदर डेअरीचे टोकन दूध आता ४२ रुपये होणार आहे; तर फुल क्रीम दूध जे ५३ रुपये प्रतिलिटर दराने मिळत होते ते तीन रुपये वाढून त्याची किंमत आता ५५ रुपये झाली आहे. फुल क्रीम प्रीमियम २६ रुपयांना अर्धा लिटर मिळत होते, ते आता ३० रुपयांना मिळेल, तर ४२ रुपये प्रतिलिटर मिळणारे टोण्ड दूध आता ४५ रुपयांना मिळेल. डबल टोण्ड दूध ३६ रुपये लिटर दराने मिळत होते, ते आता ३९ रुपयांना मिळणार आहे. गायीच्या दुधाचा प्रतिलिटर दरही ४४वरून ४७ झाला आहे.

Protected Content