बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यात सर्वप्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून येण्याचा मान डॉ. निरूपमा डांगे यांनी मिळविला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 11 डिसेंबर 2019 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
नूतन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा ह्या 2010 च्या महाराष्ट्र कॅडेट मधील आयएएस अधिकारी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर नंदुरबार येथे परिविक्षाधीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी 2010 मध्ये कार्यभार सांभाळला. त्यानंतर 2012 मध्ये उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे कामकाज त्यांनी सांभाळले. सन 2014 मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे त्यांनी स्वीकारली. त्यानंतर 2017 मध्ये नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनच्या सह निवासी आयुक्त पदाचे त्यांनी कामकाज सांभाळले. आता त्या बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी 11 डिसेंबर 2019 रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे प्रभारी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते स्विकारला.