जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व अध्यापक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता विद्यार्थ्याकडून करण्यात आली. यावेळी स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांनी आम्ही भावी शिक्षक म्हणून कटिबद्ध आहोत असे मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे व मास कम्युनिकेसशन विभागाचे विभाग प्रमुख संदीप केदार यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी स्वच्छता अभियानाला राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. वंदना चौधरी व प्रा. प्रवीण कोल्हे, अध्यापक विद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.डी.डी. भाटेवाल, प्रा. शालिनी तायडे, प्रा. संगीता पाटील, प्रा.किसन पावरा, संजय जुमनाके व आदी मान्यवर उपस्थित होते.