जळगाव प्रतिनिधी । खेडी येथे एकाने मध्यरात्री आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर स्वतः देखील आज सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. दरम्यान, हा सर्व धक्कादायक प्रकार कौटुंबिक कलहातून घडल्याचे मयत विवाहितेच्या भाऊने दिलेल्या फिर्यादमधून उघड झाले आहे.
सासरवाडीला होते वास्तव्यास
मयत विवाहितेत्या भाऊ अर्जून भालेराव यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, समाधान रमेश सावळे (वय-३५) आणि सोनी उर्फ सोनल समाधान सावळे (वय -३०) दोघी रा. धारशेरी पाळधी ता. धरणगाव (ह.मु. अंबेडकर नगर खेडी) यांचा विवाह 2006 मध्ये रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नानंतर दोघे काही दिवस सुरत येथे तर काही दिवस धारशेरी येथे राहिले. गेल्या वर्षभरापासून समाधान सावळे व सोनी सावळे हे आपल्या मुलगी प्रज्ञा (वय-12 वर्षे), अंजली (वय-10 वर्षे) आणि राज (वय-7) यांच्यासोबत सासरवाडी खेडी गावात राहत होते. समाधान हा शहरातील हिरा ॲग्रो ठिंबक कंपनीत कामाला होता. दरम्यान गेल्या महिनाभरापासून तो घरीच होता.
मुलीसमोर केला आईचा खून
10 डिसेंबर 2019 रोजी रात्री 8.30 वाजता सोनल, घराच्या बाजूला राहत असलेली तिची आई व सोनलचा नंदोई भाऊ ज्ञानेश्वर सोनवणे रा. कोळन्हावी असे सुरत येथून घरी खेडी येथे आले होते. सोनलचा भाऊ अर्जून भालेराव व तिची बहिण मंगलाबाई असे रात्री 11 वाजता सोनलच्या घरी गप्पा गोष्टी करीत असतांना सोनल हिने सामाधान याला, ‘काय नाकाच्या फिंगऱ्या फुलून पाहतो’ असे बोलून मस्करी केली. काम करत नाही, रिकामा राहतो, पोट कसे भरणार यावरून रात्री पती समाधान व पत्नी सोनल यांच्या भांडण सुरू होते. नंतर समाधान आणि सोनल हे पलंगावर झोपले. त्याचा खोलीत खाली नंदोई ज्ञानेश्वर सोनवणे, तिची मुलगी नेहा, आणि प्रज्ञा, अंजली व राज हे झोपले होते. यावेळी अंजलीला जाग आल्याने समाधान हा सोनलला कुऱ्हाडीने वार करून मारत होता. त्यावेळी सोनल पिण्यासाठी पाणी मागत असतांना तिला अंजलीली देखील आरोपीने धमकावत तुला देखील मारून टाकेन असे सांगून शांत झोपायला सांगितले. 11 डिसेंबर रोजी सकाळी 4 वाजता भाची अंजलीचा रडण्याचा आवाज आल्याने बहिणीचा खून करून मृतदेह पडलेला भाऊ अर्जूनला दिसला.
पत्नीचा खून करून रेल्वे खाली आत्महत्या
दरम्यान पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून करून आरोपी समाधान सावळे हा घटनास्थळाहून फरार झाला होता. घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांनी धाव घेतली. यावेळी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. पोलीसांसह मयत विवाहितेचे नातेवाईक यांची जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात गर्दी जमली होती. सकाळी 10 वाजता शनीपेठ पोलीसांच्या हद्दीतील आसोदा रेल्वे फाट्यावर एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. जिल्हा रूग्णालयात मृतदेह आणल्यानंतर तो आरोपी समाधान सावळे याचा असल्याची ओळख पटली.
आत्महत्या करण्यापूर्वी रस्त्यावरच फेकला मोबाईल
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी समाधान सावळे यांने घरातून पलायन केले. रस्त्यावर जात असतांना शनी पेठ पोलीसांच्या हद्दीत एका खड्ड्यात त्याने त्याचा मोबाईल फेकून दिला. याच काळात एमआयडीसी पोलीसांनी बसस्थानक व रेल्वेस्टेशन येथे आरोपीच्या शोधात रवाना झाला होते. आरोपी समाधान याने रेल्वे खाली आत्महत्या केल्याचे पोलीसांना माहित पडल्यानंतर एमआयडीसीचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे जात असतांना एका मुलाने त्यांना सांगितले रस्त्याच्या कडेला एक मोबाईल सारखा वाजत आहे. त्यानुसार खात्री करून पाहिले असता हा मोबाईल आरोपी समाधान सोनवणेचा असल्याचे आढळले. मयत विवाहितेच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, भाऊ, आई आणि तीन बहिणी असा परिवार आहे