भुसावळ, प्रतिनिधी | हद्दपार आरोपीस टिंबर मार्केट येथून रविवार दि. ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता अटक करण्यात आली. त्यास एका वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळलेल्या बातमी वरून एक वर्षाकरिता हद्दपार असलेला आरोपी विष्णू परशुराम पथरोड ( वय २२, रा. ७२ खोली वाल्मिक नगर भुसावळ) हा भुसावळ शहरात टिंबर मार्केट परिसरातील आखाड्याजवळ येथे बेकायदेशीररित्या प्रवेश करताना आढळून आला. दरम्यान, हद्दपार आरोपी विष्णू पथरोड यास सदर ठिकानावरून ताब्यात घेत असताना त्यांने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यामुळे त्याच्याविरुद्ध भाग ५ गुरन ५६९/२०१९ भादवी कलम ३५२,३३२ सह मुंबई पोलीस कायदा कलम-१४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, पो. का. विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी केली आहे.