Home Cities जळगाव प्रश्नपत्रिकेत शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख ; राष्ट्रवादीकडून विद्यापीठाचा निषेध

प्रश्नपत्रिकेत शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख ; राष्ट्रवादीकडून विद्यापीठाचा निषेध


NMU 1

जळगाव (प्रतिनिधी) एस.वाय.बी.एच्या सामान्य इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा काही प्रश्नांमध्ये एकेरी उल्लेख करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा निषेध करण्यात आला आहे.

 

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, एस.वाय.बी.एच्या सामान्य इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेत आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा काही प्रश्नांमध्ये एकरी उल्लेख उल्लेख करण्यात आलेला आहे. हा सर्व प्रकार निंदनीय व खेदजनक आहे. या प्रश्नपत्रिकेत चुका या जाणीवपूर्वक केल्या आहेत,असा आरोही राष्ट्रवादीने केला आहे. विद्यापीठ प्रशासनाचे जे पेपर सेटर्स आहेत, त्यांनी पेपर सेटिंगच्या वेळेस या चुका त्यांच्या लक्षात न येणे? ही अशी काही छोठी चूक नाही. त्यामुळे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाचा व पेपर सेटर्सचा जाहीर निषेध करतो, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाणे, अमळनेरचे माजी माजी शहराध्यक्ष उमेश सोनार, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील यांनी हा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासन माफी मागणार असल्याचे कळते.


Protected Content

Play sound