भुसावळ, प्रतिनिधी | मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गुप्ता यांनी बाबासाहेबांच्या जिवनावर मार्गदर्शन केले.
मंडल रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी आपले विचार प्रकट करतांना सांगितले की, जातीगत व्यवस्था समुळ जो पर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्या देशात एकता येऊ शकत नाही अशी बाबासाहेबांची धारणा होती. यावेळी अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे, सीआरएमएसचे प्रतिनीधी व्हि. के. समाधीया,एस. बी. पाटील, नन्दू उपाध्याय, एनआरएमयुचे पुष्पेंद्र कापडे, एससीएसटीचे आर. सी. रावत, गुलाब सोनवणे, ऑल इंडीया ओबीसी असोसीएशनचे चंद्रशेखर नेहेते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्मीक अधिकारी एन. डी. गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन आर. एच. परदेशी तर आभार विरेंद्र वडनेरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी एन. डी.गांगुर्डे, वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कल्याण निरीक्षकांनी व सर्व रेल कर्माचा-यांनी परीश्रम घेतले.