Home Cities अमळनेर प्राध्यापक एस बी.महाजन यांना मातृशोक

प्राध्यापक एस बी.महाजन यांना मातृशोक


अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील एन.एम.कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक एस .बी. महाजन यांच्या मातोश्री गं.भा देवकाबाई बाबुराव महाजन (९०)यांचे आज 12 वाजून 45 मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी राहत्या घरातून दुपारी तीन वाजता निघणार आहे.

कळमसरे येथील माळी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक एस.बी महाजन व त्यांचे छोटे बंधू प्रकाशभाऊ महाजन व घरातील परीवाराने आईची शेवटपर्यंत मनोभावे सेवा केली. कै गं.भा देवकाआई यांचा स्वभाव सोज्वळ व प्रेमळ असा होता. त्यांनी आपल्या परिवाराला एक सूत्रात बांधून ठेवलेले होते .आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून एकाला कळमसरेच्या माध्यमिक हायस्कूलमध्ये व कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून शैक्षणिक सेवा करायला संधी दिली. तरी एक भाऊ आदर्श शेतकरी म्हणून परीसरात परिचित आहे. गं.भा देवकाबाई यांची अंत्ययात्रा उद्या कळमसरे येथून राहत्या घरातून दुपारी तीन वाजता निघणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound