Home अर्थ ग्राहकांना दिलासा ; पेट्रोल झालं स्वस्त

ग्राहकांना दिलासा ; पेट्रोल झालं स्वस्त

0
20

petrol and voting

मुंबई प्रतिनिधी । सलग चार दिवस किंमती स्थिर राहिल्यानंतर पेट्रोलच्या दरात आज (दि.६) पाच पैशांची घसरण झाली. एका महिन्यानंतर प्रथमच पेट्रोल स्वस्त झाले असून ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मात्र, डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कोणताही बदल झाला नाही. मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८० रुपये ८१ पैसे आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर ६९ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७४ रुपये ८६ पैसे मोजावे लागत असून डिझेल ६५ रुपये ७८ पैसे आहे. बंगळूरमध्ये पेट्रोलचा दर ७७ रुपये ४२ पैसे असून डिझेल ६८.०२ रुपये आहे. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


Protected Content

Play sound