Home राजकीय भाजप सरकारच्या काळातील कामांना स्थगितीचे आदेश

भाजप सरकारच्या काळातील कामांना स्थगितीचे आदेश

0
45
THAKRE


THAKRE
 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे वाटप करताना पक्षपातीपणा झाल्याचा आरोप तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. आता विकास आघाडीचे सरकार येताच या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे.

 

भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे, कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गतील कामे, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकासाची कामे, यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या 2019-20 सालातील अजूनही कार्यआरंभ मंजुरी न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचा आदेश देण्यात आला आहे. या कामांना दोन कोटींपासून 25 कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळाले होते.


Protected Content

Play sound