Home क्राईम जवानाचा सहकार्‍यांवर गोळीबार; सहा जणांचा मृत्यू

जवानाचा सहकार्‍यांवर गोळीबार; सहा जणांचा मृत्यू

0
22


रायपूर वृत्तसंस्था । इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्सच्या जवानाने आपल्या सहकार्‍यांवर केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आयटीपीबीच्या जवानानं त्याच्या सहकार्‍यांवर गोळीबार केला. त्यामध्ये त्याच्या सहा सहकार्‍यांचा मृत्यू झाला. तर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधीत जवानाने सुट्टी न मिळाल्यानं त्यानं हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Protected Content

Play sound