Home Cities जळगाव जळगावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात व्याख्यान (व्हिडीओ)

जळगावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात व्याख्यान (व्हिडीओ)

0
48


jijamata

जळगाव प्रतिनिधी । शहरातील न्यू जागृती मित्र मंडळ संचालित जिजामाता माध्यमिक विद्यालय आणि रोटरी क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 7बाय7बाय7 कार्यक्रमांतर्गत ऍड. श्रीकांत भुसारी यांचे व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

ऍड. श्रीकांत भुसारी यांनी कायद्याची ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली. तसेच ग्राहकांचे अधिकार, बिल घेतल्याचे फायदे या सर्व गोष्टी मनोरंजक रित्या विद्यार्थ्यांना समजावून दिल्या. या व्याख्यानावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे, संजय खैरनार, किशोर पाटील, लता इखनकर, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, शैलजा चौधरी, संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय खैरनार तर आभार राजेंद्र खोरखेडे यांनी मानले.


Protected Content

Play sound