Home अर्थ भुसावळ येथे जीएसटी चर्चासत्र उत्साहात

भुसावळ येथे जीएसटी चर्चासत्र उत्साहात

0
37

raver

 

भुसावळ प्रतिनिधी ।  येथील रोटरी क्लब ताप्ती व्हॅली व व्यापारी महामंडळातर्फे आज (दि.३) रोजी माहेश्वरी भवनात जीएसटी प्रणालीवर शंका समाधान करण्यासाठी जीएसटी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रात जीएसटी विभाग प्रमुख तथा संयुक्त आयुक्त अनंत राख, जिल्हाध्यक्ष सी.ए.मगन पाटील, साहेबराव पाटील व अधिकारी परदेशी यांनी व्यापारी बांधवांनी उपस्‍थित केलेल्या प्रश्न व शंकांचे समाधान केले. याप्रसंगी अनंत राख यांनी व्यापारी बांधवांनी घ्यावयाची काळजी दक्षता या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. व्यापारी बंधूंनी वेळेचे बंधन पळून वेळेवरच कर भरावा असे आवाहन देखील यावेळी केले. मगन पाटील यांनी सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सवलती व योजनांबाबत माहिती दिली. रोटरीचे अध्यक्ष सुनील शिरनामे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रामावेळी महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष राधेश्‍याम लाहोटी, सचिव पवन चव्हाण यांच्यासह आदी उपस्थित होते.

कार्यक्रामाचे सूत्रसंचालन सीए.गोपाल अग्रवाल व सीए.सोनल अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमास सीए.एम.बी. अग्रवाल, प्रा.दिनेश राठी, चेतन पाटील, डॉ.सुधीर शर्मा, दीनानाथ ओगले, वंदना पारख, स्वाती देव, सीमा अग्रवाल, जे.बी.कोटेचा, ब्रिजेश लाहोटी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीए.मुकेश अग्रवाल, सुधाकर सनांसे, तानाजी पाटील, धर्मेंद्र मेंडकी, शैलेंद्र पाटील, अभय माहुरकर, निलेश सोनी आदींनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound