जळगाव, प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६९ मतं पडली तर विरोधात एकही मत नव्हते. हा विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने आज महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी महापालिकेत आतिषबाजी करून जल्लोष केला.
महाराष्ट्र राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकासाघाडीचे सरकार स्थापन होऊन आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यानिमित्ताने जळगावात फटाक्याची आतिषबाजी महानगरपालिकेत जल्लोष करण्यात आला. राज्यात महाविकासाघाडी सरकारने बहुमत सिद्ध केल्याने दुपारी ४.३० वाजता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतर्फे जल्लोष करून आनंदउत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन , संघटन दिनेश जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस महानगरअध्यक्ष नामदेव चौधरी, शिवसैनिक, तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.