ॲडलेड वृत्तसंस्था । येथील ओव्हल मैदानावर पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने गुलाबी चेंडूवर धडाकेबाज त्रिशतक ठोकले आहे. पाकिस्तान विरुद्ध त्रिशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
पाकविरुद्ध सुरू असलेल्या या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५५० धावांचा डोंगर उभारला आहे. त्यात वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकाचा समावेश आहे. ३८९ चेडूंमध्ये त्याने हे त्रिशतक पूर्ण केले. त्यात ३७ चौकारांचा समावेश आहे. १२० षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने दिमाखात हे त्रिशतक साजरे केले. तो ३३५ धावांवर नाबाद राहिला. ब्रॅडमन आणि नंतर टेलर यांचा विक्रम मोडल्यानंतर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला.