जळगाव प्रतिनिधी । येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी वेळेत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकार्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी वेळेच्या आत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी भाजपचे अतुल वसंतराव पाटील यांनी केली होती. हे प्रकरण जिल्हाधिकार्यांकडे गेले होते. या प्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेत जिल्हाधिकारी ढाकणे यांनी त्यांना आज अपात्र घोषीत केले असून हे आदेश मुख्याधिकार्यांकडे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, पाचोरा येथील संजय वाघ, भूषण वाघ आणि रंजना भोसले यांनी एका कामाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही निवीदा रद्द करण्याचे आदेशदेखील जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.