Home धर्म-समाज भुसावळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात (व्हिडीओ)

भुसावळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात (व्हिडीओ)

0
38


bhusaval 2

 

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.

संविधान दिनानिमित्ताने विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचली. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. डॉ. शर्मा, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर डॉ. स्वप्निल निला आणि सर्व शाखांचे अधिकारी, सर्व विभागांचे शाखा प्रमुख, सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी रेल्वे कर्मचा-यांनी एक नाटक सादर केले. या नाटकाला रेल्वे शाळेचे उपप्राचार्य सतीश कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्याहस्ते नाटकास 5 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.


Protected Content

Play sound