जळगाव प्रतिनिधी । फिरायला नेण्याच्या बहाण्याने घराजवळील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीली रिक्षात बसून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार 24 रोजी दुपारी घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा फरार आहे. प्रकाश सुरेश नागपुरे (रा.रामेश्वर कॉलनी), गणेश (पुर्ण नाव माहित नाही) असे दोन्ही संशयितांचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीत राहणारी ही अल्पवयीन तरुणी आहे. ती तीच्यावर अत्याचार करणारे गणेश व प्रकाश हे दोघे जण रिक्षाचालक असून ते देखील त्याच परिसरात राहतात. रविवारी दुपारी गणेश याने तरुणीस घराबाहेर बोलावून फिरायला जाण्यासाठी रिक्षेत बसवले. यावेळी प्रकाश रिक्षा चालवत होता. काही वेळातच तीघे जण कसुंबा येथील गोशाळेत पोहाचेले. सुमारे तासभर या परिसरात फिरल्यानंतर ते पुन्हा घरी येण्यासाठी निघाले होते. यावेळी प्रकाश याने अयोध्यानगर भागातील एका निर्मनुष्य शेतात रिक्षा नेली. तेथे रिक्षातच दोघांनी तरुणीवर सामुहिक अत्याचार केले. स्वत:चा बचाव करण्यासाठी या तरुणीने प्रचंड आरडा-ओरड केली. परंतू, तेथे कोणीही नसल्यामुळे तीच्या मतदीला कोणी आले नाही. अत्याचार केल्यानंतर दोघांनी तरुणीस पुन्हा रिक्षाने रामेश्वर कॉलनीत सोडले होते. या तरुणीने घडलेला प्रकार कुटंुबियांना सांगीतल्यानंतर रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन सोमवारी पहाटे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलीसांनी केले एकास अटक; दुसरा फरार
पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, गोविंदा पाटील, असीम तडवी व होमगार्ड नेरकर यांच्या पथकाने रात्रीच प्रकाश याला अटक केली. पोलिसांना पाहुन त्याने अंधारातून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. काही अंतर पाठलाग करुन पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान, प्रकाशला न्यायालयात हजर केले होते. सुनावणीअंती त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक विशाल वाठोरे तपास करीत आहेत.