चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुका शिवसेनेच्या वतीने आज (दि.२५) येथील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालय दरम्यान धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाद्वारे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत त्वरित मंजूर करावी, पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा त्वरित मिळावा, राज्यपालांनी जाहीर केलेली आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा व्हावी, परतीच्या पावसात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या कर्ज कपातीस बँकांना मनाई व्हावी, अशा मागण्या तहसीलदारांकडे करण्यात आल्या आहेत. या मोर्चात शिवसेनेचे सर्व शहर तालुका पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी शहर दणाणले होते.
मोर्चात शिवसेनेचे शिवसेना तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाने, रोहिदास पाटील, प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शेतकरी सेना तालुका प्रमुख संजय संतोष पाटील, धर्मा खंडू काळे, नंदकिशोर बाविस्कर, संजय ठाकरे, तुकाराम पाटील, हिंमत निकम, सुरेश पाटील, जगदीश महाजन, अनिल राठोड, अण्णा पाटील, सुभाष राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, विठ्ठल पवार, सुनील मराठे, किरण घोरपडे, विलास शिंदे, प्रभाकर दिनेश घोरपडे, दिलीप पाटील, शैलेंद्र सातपुते, मनोज कुमावत, अनिल पाटील, सचिन ठाकरे, अनिल राठोड, वसीम चेअरमन संदीप पाटील, सागर पाटील, गोपाल परदेशी, दिलीप राठोड, नंदू गायकवाड, पांडुरंग बोराडे, गणेश भवर, संतोष गायकवाड, गोपाल पाटील, सचिन गुंजाळ, अनिल कुठे, दिनेश विसपुते, राजू शेळके, सुमित शेळके, शुभम शिंदे, अमोल चौधरी, रवींद्र चौधरी, सुनिल पवार व बापु आगोणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.