Home Cities चाळीसगाव शिवसेनेचा उद्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

शिवसेनेचा उद्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

0
63

jalgaon Shivsena

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुका शिवसेनेतर्फे उद्या दिनांक २५ रोजी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

दिनांक २५ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव तालुका शिवसेनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी सकाळी १० वाजता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत त्वरित मंजूर करावी, पिक विमा काढलेल्या शेतकर्‍यांना पिक विमा त्वरित मिळावा, राज्यपालांनी जाहीर केलेली आर्थिक मदत शेतकर्‍यांच्या खात्यात त्वरित जमा व्हावी, परतीच्या पावसात झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांच्या कर्ज कपातीस बँकांना मनाई व्हावी, या मागण्यांचा समावेश आहे.

या मोर्चात शिवसेनेच्या सर्व शहर तालुका पदाधिकारी शिवसैनिक शेतकरी बांधव शेतमजूर यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नाना कुमावत यांनी केले आहे.


Protected Content

Play sound