मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीला फुटण्यापासून वाचवायचे असेल तर भाजपसोबत आघाडी करून सत्तेत सहभागी व्हावे असा सल्लावजा निरोप अजितदादांनी शरद पवार यांना पाठविल्याचे वृत्त आहे.
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. यात धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असणारे बहुतांश आमदार सहभागी झाले आहेत. या बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. मोबाईलवरून हा निरोप त्यांना देण्यात आला. यावर अजित पवारांनी राष्ट्रवादीला फुटीपासून वाचवायचे असेल तर भाजपसोबत आघाडी करून सत्तेत सहभागी व्हावे असा उलट निरोप पाठविला. अर्थात, त्यांनी माघार घेण्याचे स्पष्ट नाकारल्याचे दिसून येत आहे.