जळगाव प्रतिनिधी – जिल्हा सत्र न्यायालयातील सहा. सरकारी वकील संभाजी जाधव हे १९ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सह परिवार सत्कार करत जिल्हा सरकारी वकील कार्यालयातर्फे निरोप देण्यात आला.
गर्भ निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व खटल्याचे त्यांनी कामकाज बघितले आहे. त्यांनी शासकीय समितीवर सल्लागार पदावरही काम केले असून याबद्दल राज्य शासनाने त्यांचा विशेष सत्कार देखील केला आहे. निरोप समारंभा प्रसंगी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, सहाय्यक सरकारी वकील सुरेंद्र काबरा, मोहन देशपांडे, अनुराधा वाणी, पंढरीनाथ चौधरी यांनी त्यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी सहा. सरकारी वकील ॲड. प्रदीप महाजन, ॲड. निलेश चौधरी, ॲड. सी.आर. बोरसे, ॲड. वैशाली महाजन, ॲड. भारती खडसे य्पस्थित होते. ॲड.रमाकांत सोनवणे यांनी सुत्रसंचालन केले.