Home Cities चाळीसगाव भुयारी गटार योजनेचा नागरिकांच्या हस्ते शुभारंभ

भुयारी गटार योजनेचा नागरिकांच्या हस्ते शुभारंभ

0
30

chalisagaon 2

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील बहुप्रतिक्षित भुयारी गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ नुकताच प्रभाग क्र.१ मधून नागरिकांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.

शहराला खुली गटार व डासमुक्त करण्यासाठी, नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महत्वाची असणारी भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी ६८ कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच दिमाखदार सोहळ्यात त्याचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आधी केले मग सांगितले, यानुसार लवकरच चाळीसगाव शहरातील रस्ते-पाणी-गटार आदी मूलभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रभाग क्र.१ चे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील व विजया पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound