नवी दिल्ली वृत्तसंस्था । न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी आज सकाळी सरन्यायाधिशपदी विराजमान झाले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली.
रंजन गोगोई यांचा कालखंड रविवारी संपल्यानंतर आधीच जाहीर झाल्यानुसार आज न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी सरन्यायाधिशपदाची सूत्रे स्वीकारली. आज सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत त्यांनी सरन्यायाधिशपदाची शपथ घेतली. न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्रगडकर, न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह व न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचुड यांच्यानंतर सरन्यायाधिशपदी विराजमान होणार बोबडे हे चौथे मराठी न्यायाधिश ठरले आहेत.