Home राजकीय फडणवीसांविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

फडणवीसांविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी


 

dev 1573981061
 

मुंबई (वृत्तसंस्था) ‘मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदवला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर आले असता, शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

 

आज सकाळपासून शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले असताना भारतीय जनता पक्षाच्या मात्र एकही नेत्याने शिवतीर्थावर हजेरी लावलेली नव्हती. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी शिवतीर्थावर येत आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादनासाठी आले असताना स्वागतासाठी शिवसेनेतील कुणीही मोठा नेता शिवतीर्थावर हजर नव्हता. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. शिवतीर्थावर पुष्प अर्पण करून फडणवीस यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ आल्यानंतर त्यांनी हात जोडले. फडणवीस निघून गेल्यानंतर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस परत जात असताना शिवतीर्थावर जमलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी फडणवीस यांच्या विरोधात रोष व्यक्त केला.


Protected Content

Play sound