Home क्राईम शहरात वेगवेगळ्या घटनेत सात जणांना कुत्र्याचा चावा

शहरात वेगवेगळ्या घटनेत सात जणांना कुत्र्याचा चावा


जळगाव प्रतिनिधी । शहरात विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. रविवारी दिवसभरात सात जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असून सातही जणांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अनिल दामोदर नापाडे (वय ६२), राजुसिंग ठाकुर (४२), पंकज रणवीरसिंग ठाकुर (२८), शेख अशपाक शेख फिरोज (२२), निर्मल राठोड शर्मा (२९), विशाल भास्कर मोरे (१८) व अक्षय राजु बाऱ्हे (२२) यांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांकडून होते आहे.


Protected Content

Play sound