भाजपने जनादेशाचा अपमान केलाय : संजय राऊत

sanjay raut 3

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाच्या अहंकाराने महाराष्ट्रातील जनादेशाचा अपमान केला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ता आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर पलटवार केला आहे.

 

राज्यातील जनतेने सत्तेसाठी जनादेश दिला असतानाही, आम्ही विरोधी पक्षात बसू पण मित्रपक्षाशी चर्चा करणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. राज्यपालांनी १०५ जागा असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी ४८ तास दिले असताना शिवसेनेला मात्र २४ तासांचीच वेळ दिली, असे म्हणत राज्यपालांनी आम्हाला अधिक वेळ देण्याची गरज होती असेही राऊत म्हणाले. तर आघाडीसोबत शिवसेना स्थिर सरकार देणार असून शेतकरी, शिक्षण, रोजगार अशा मुद्द्यांवर एकत्र येण्याचे काम सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन होईल असेही ते म्हणाले.

Protected Content