मुंबई वृत्तसंस्था । भारताचा फिरकीपटू आणि आय़पीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन पुढच्या आयपीएलमध्ये पंजाबकडून न खेळता तो दुसऱ्या संघाकडून खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन 2020 मध्ये दिल्लीकडून खेळणार आहे.
यापूर्वी ३३ वर्षीय अश्विन पंजाबनंतर कोणत्या संघाकडून खेळणार याबाबत चर्चा सुरु होती. अश्विनला रिलीज करण्याचा निर्णय पंजाबने घेतल्यानंतर दिल्लीने त्याला विकत घेण्यासाठी पावले उचलली होती. याशिवाय इतर संघांनीही अश्विनला घेण्यासाठी हालचाली केल्या होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पंजाब आणि दिल्लीमध्ये यावर चर्चा सुरू असतांना दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याचा समावेश झाल्यामुळे चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे.
अश्विनने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १३९ सामने खेळले, ज्यात १२५ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. ३४ धावा देऊन ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. जी २०१६ च्या मोसमात नोंदवण्यात आली होती. याशिवाय त्याने एकूण ३७५ धावाही केल्या आहेत. ही त्याची ४५ वी सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.