सोलापुरात शिवसेनेचे बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्याला मारहाण

solapur

सोलापूर प्रतिनिधी । राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदान सुरळीत पार पडत असताना करमाळ येथे मात्र मतदानाला गालबोट लागले आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या काही कार्यकर्त्याला जबर मारहाण झाली आहे. या मारहाणीत नारायण पाटील यांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना डोक्याला मारहाण झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला आहे.

Protected Content