Home मनोरंजन सलमान खानचा अंगररक्षक शेराचा शिवसेनेत प्रवेश

सलमान खानचा अंगररक्षक शेराचा शिवसेनेत प्रवेश

0
29

shera

मुंबई प्रतिनिधी । बॉलिवुडचा स्टार सलमान खानचा विश्वासू बॉडिगार्ड गुरमीत सिंग उर्फ ‘शेरा’ याने शिवसेनेत प्रवेश केला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर शिवबंधन बांधले. तर शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेराच्या हाती शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केले.

शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीला अगदी दोन दिवस शिल्लक राहिले असताना शेराने शिवसेनेत प्रवेश केला असल्याने सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. सलमान खानचा जवळचा आणि अंत्यत विश्वासू म्हणून शेराची ओळख आहे. मागील २२ वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडिगार्ड म्हणून काम करत आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता शनिवारी होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवशी शेरा प्रचारात उतरणार का, याची चर्चा सुरू आहे.


Protected Content

Play sound