Home राजकीय महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर बहुमत मिळेल : अमित शाह

महाराष्ट्रात भाजपाला स्वबळावर बहुमत मिळेल : अमित शाह


amit shaha
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युतील बहुमत मिळेल यात कोणतीही शंका नाही. परंतु भाजपाला स्वबळावर बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

यावेळी अमित शाह यांनी म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले होते आणि विजयी झाले होते. विधानसभेतही आम्ही एकत्र लढत आहोत आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ, असे शाह यावेळी युतीबद्दल बोलताना म्हणाले. शिवसेनेनेही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा दावा केला आहे. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, या वक्तव्यामुळे युतीला कोणताही धोका आहे असे मी मानत नाही. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच भाजपाकडून मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, ही बाब स्पष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.


Protected Content

Play sound