Home Cities जळगाव अपक्ष उमेदवार अत्तरदे यांचा धामणगाव येथे प्रचार दौरा

अपक्ष उमेदवार अत्तरदे यांचा धामणगाव येथे प्रचार दौरा

0
27

WhatsApp Image 2019 10 16 at 12.13.37 PM

धामणगाव, प्रतिनिधी | अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा धामणगाव येथे भव्य असा प्रचार दौरा आज बुधवार १६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व स्थानिक जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले.

जळगाव ग्रामीण मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज सकाळी ९.०० वा. धामणगाव येथे भेट देऊन प्रचार केला. यावेळी गावातील नागरिकांतर्फे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी कृ.उ.बा.स. सभापति लकी आण्णा उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख समाधान कोळी, किरण पाटील, बूथ प्रमुख मनेश सपकाळे, राजेंद्र पाटील, किरण पाटील, गोपाल मोरे, सुधीर पाटील, रविंद्र पाटील उपस्थित होते. तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound