प्रयागराज वृत्तसंस्था । येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आजच्या मुहूर्तावर शाही स्नानासाठी विक्रमी गर्दी उसळली आहे.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आज मौनी अमावस्या निमित्त भल्या पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने स्नानास प्रारंभ केला आहे सकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे एक करोड पेक्षा जास्त भाविकांनी पवित्र स्नान केले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर मुहूर्त पूर्ण होइपर्यंत हा आकडा तीन करोड वर जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला आहे.